STORYMIRROR

Shivani Khopade

Others

2  

Shivani Khopade

Others

बाप नावाचा माणूस

बाप नावाचा माणूस

2 mins
400

   मूल ज्यावेळी जन्माला येते, त्यावेळी डोळे उघडून ते प्रथमदर्शनी आपल्या आईला ओळखते, किती ती किमया!! पण तेच मूल जन्माला आल्यावर,

आपण बाप झालो, या आनंदात असणाऱ्या त्या बापाला मात्र जरा उशिराच ओळखतं. बाप, बाबा, वडील, पिता, जन्मदाता अशा कितीतरी शब्दांनी परिपूर्ण तो पुरुष समजण्यास जरा अवघडच वाटतो मला. 


   लहानपणी, इवलीशी पावलं जेव्हा, तुरुतुरु धावताना पडली की, जखम होते ती या बापाला. असं म्हणतात आईजवळ अश्रुंचे पाट असतात, पण बापाजवळ तर अश्रुंचे धरण असते हो!! ते बांध तो कधीच सुटू देत नाही इतकच, म्हणून तो हळवा होत नसतो, असं नसते ! आपल्या बाळाने काहीतरी नवीन केले की, त्याचा जास्त आनंद आणि कौतुक ते या बापाला असतं, फक्त ते व्यक्त करताना त्याला शब्द कमी पडतात. 


   आई घरातली सगळी काम करून दमते, ते पाहून मला बऱ्याचदा वाटते की, किती ती कामं असतात आईला, पण दिवसभर उन्हात, गर्दीने भरलेल्या जागी अंगा-पायाच्या काड्या करणाऱ्या त्या बापाचे कष्ट मात्र अदृश्य होतात. 'तू शिकून मोठी हो, स्वतःचा पायावर उभी राहा', असं म्हणून शाब्बासकी ची थाप देणाऱ्या त्या हातात किती मायेचा तजेला आणि कष्टाची वेचन असते. 


    मुलांच्या प्रत्येक चुकीला फटकावणारी ती आई, आणि त्त्यांचावर कधीच हात न उचलणारा, त्त्यांना समजून घेणारा, फुलाचा कळीप्रमाणे जपणारा तो बाप, या दोघांचा वागण्याची सांगड घालणे कठीणच! घराचा करता पुरुष, असं म्हणलं जाणाऱ्या या बापाला आपण कधी समजून घेतलं का? देवकीचे, यशोदेचे कौतुक अवश्य केले, पण पुरातुन मुलाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव मात्र आपण विसरलो. 


     मुलांसाठी वणवण करून कॉलेजात फिरणारा, शाळेच्या, कॉलेजच्या एवढ्याला फी भरणारा, " कॉलेजला पोहोचल्यावर फोन कर!!" असं म्हणणाऱ्या त्या बापाची काळजी समजण अवघडच. मुलगी सासरी निघाल्यावर धायमोकळून रडणाऱ्या त्या बापाची, "माझ्या चिमुकलीला नीट सांभाळा", अशी हात जोडून केलेली विनंती डोळे पाणावतात. 

      'Mothers day'च्या दिवशी आईला wish करणारे आपण 'father's day' च्या दिवशी बापाला wish करताना कमीच आढळतो. 

      अशा या बाप नावाचा माणसाला समजायला आपण का कमी पडतो..? 


साहित्याला गुण द्या
लॉग इन