Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Suvarna Patukale

Children Stories


4.0  

Suvarna Patukale

Children Stories


बालपणीचा काळ सुखाचा

बालपणीचा काळ सुखाचा

3 mins 185 3 mins 185

  त्या दिवशी आईच्या कुशीत शिरून खूप खूप रडावे असे वाटले. या धावपळीच्या जीवनात तो विसावा हरवून गेला. मैत्रिणींशी गप्पा मारत निवांत खेळ खेळावे असे वाटते. 


बालपणीचा खेळ कुणी द्या

बोलायला वेळ कुणी द्या

झोके घेऊन आज सख्यांशी

खेळायला वेळ कुणी द्या

वाटते शिरावे कुशीत आई च्या

विसाव्यास त्या वेळ कुणी द्या

झोके घेऊन आज सख्यांशी

खेळायला वेळ कुणी द्या


खरंच, किती सुंदर ते बालपण त्या सुंदर निरागस आठवणी. शिक्षण तर आयुष्यभर शिकतोच. पण ते माहेरच वातावरण मनमोकळे पणा परत आयुष्यात येतच नाही. ते सोनेरी दिवस. त्या क्षणांची सर कोणत्या सुखाला नाही. अगदी हट्टाने घेतलेली वस्तू. असो वा धडपडून पाडलेल्या चिंचा आवळे जांभळे अणि कैर्‍या. त्याचा आनंदच वेगळा.


    लहानपणी आजी लवकर उठून देवळात काकड आरती ला जायची. तिच्या बरोबर आमची ही तयारी. खूप छान वाटायचं. देवळात भावे आजी फार सुंदर रांगोळी काढायच्या. अगदी हुबेहुब राधाकृष्ण. विठ्ठल रखूमाई. त्यांचे बघून रांगोळीचे वेड लागले. मग आम्हीही एकलव्य. आमची आम्ही शिकलो रांगोळी काढून आनंद घ्यायला. आमच्या आळीत ज्यांच्या घरी कुणी मुली नाहीत तिथे बोलावणे सणाला आमच्या पण दारात काढ हा रांगोळी. फराळाचे पदार्थ करायला सगळ्यांच्या घरी मदतीला. फराळ घरपोच. आई च्या कडे तोंड भरून कौतुक. तुमची मुलगी सगळ्यांना मदत करते हुशार आहे. आई म्हणायची, जरा पोरीचा पाय घरात नसतो. सगळ्या घरची झालीय.


आजोबा दिवाणजी होते. तेव्हा त्यांना काही घरी आणलेले काम करू लागले की 10 पैसे देऊन ते खुश करायचे. अणि त्या साठी मी त्यांना रोजच लिहायला मदत करायचे. अणि मिळालेले पैसे साठवून तर कधी खाऊन संपायचे. त्या काळात मस्त खाऊ यायचा तेवढ्या पैशात. 10 बोटात 10 बॉबी अडकवून खात खात काय मजा यायची. मीठ लावून ठेवलेले चिंचेचे गोळे. गारेगार. कितीतरी लेमन च्या गोळ्या. छोटी खारी अष्टकोनी बिस्किटे, केवढं यायच त्या 10 पैशात..रोज सकाळी ठरवायचे आज काय खायचं. काय ती श्रीमंती.


संस्कारवर्गाच्या आमच्या जोग बाई. माझी दुसरी आईच. किती चेष्टा करायचे माझी सगळे. सुरुवातीला गीता पाठांतर करायला आवडत नसे. पळ काढायचे. पण नंतर आपोआप गोडी निर्माण झाली. अणि एका वर्षात संपूर्ण भगवत्गीता पाठ झाली. किती कौतुक केले बाईंनी माझे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांची मी मानस कन्या झाले. खूप खूप लाड केले त्यांनी माझे संस्कार केले. शिकवले. खूप खूप शिकले त्यांच्याकडे.


      आजोबाची लाडकी. कामे पण करायचे हट्ट पण. त्यांनीही खूप खूप लाड केले आम्हा सर्व भावंडांचे. म्हातारपणात खूप सेवा केली. त्यांचे मलाच आवर्जून हाक मारून काम सांगणे आठवते. मी कोणत्याही कामाला नाही म्हणणार नाही हे त्यांना माहित. म्हणुन सारखे माझेच नाव त्यांच्या तोंडात असायचे. खूप छान गोष्टी सांगायचे आमचं बालपण आध्यात्मिक गोष्टीं सांगून त्यांनी घडवलं. किती सहज संस्कार होता तो. आवडीने झालेला.

5 भावंड. सगळ्या गोष्टी वाटून घेणे, खाणे, एकमेकांना देणे.. आई कडे हट्ट अणि वडिलांच्या धाकात. तरी मस्त हसत खेळत गेलेलं ते रम्य बालपण. मैत्रिणींशी गप्पा मारत निवांत घरी येणं, लगोरी, रुमाल पाणी, छपरी, काचा कवड्या, चल्लसपाणी, सगळे खेळ फुकट. ना पैसे खर्च. पारंब्याना झोके,दोरीवर उड्या, झिम्मा फुगडी, गाण्याच्या भेंड्या. लपाछपी, आंधळी कोशिंबीर, खेळायला काही साधन नाही. मस्त. फक्त सवंगडी.


    शाळेत पण मैदानी खेळ. कबड्डी खोखो,. वक्तृत्व स्पर्धा. गॅदरींग मध्ये सहभाग. वर्गात चोरून डबा खाण्यात माझा एक नंबर. एकदा बाई ना सापडले. अणि निष्पाप मनाने कबुली दिली. आम्हाला मधल्या सुट्टीत खेळायला वेळ पुरत नाही म्हणून खातो आम्ही डबे. मग बाकीचे सगळे सापडले. रम्य ते बालपण. आता आठवणीत जिवंत राहिलेले.


Rate this content
Log in