आईची महती
आईची महती
राबराब राबून सदा कष्ट करून कष्टाचं जीवन जगते.रक्ताचं पाणी करून मुलांना वाढविते.नऊ महिने पोटात धरून मरण यातना सहन करून मुलांना जन्म देते.मुलांना वाढविण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावते.जरी आई अडाणी असली तरी आपला पहिला गुरू व पहिला मार्गदर्शक आईच असते.आपल्या अपयशामागेही यशाची गुरूकिल्ली बनून उभी सहकार्य करते.तीच आईची विशाल ममता असते.
प्रत्येक नात्यापेक्षा मोठ
दुधाच नातं असते
आई या शब्दापुढे
सारं जग लहान दिसते...
सुवासिकता,कोमलता,सुंदरता, निर्मलता आई या शब्दातच दडलेली असते.गंगेच्या पवित्र पाण्यासारखी तीची पुण्याई सदैव लाभत असते. मुलांना वाढविण्यात ती कुठलीही कसर सोडत नसते.जरी आई कधी रागावली तरी तीच्या डोळ्यात वात्सल्यच दिसते.भाकरीचे चार तुकडे असले आणि खाणारे पाच जीव असले तरी आईच म्हणते मला भूक नाही.भूक असूनही ती मुलांसाठी भूक नसल्याच दाखवत असते.आईच मायेचा सागर असते.आणि आईच आपल्या जीवनाला आकार देत असते.हजारो लाखो व्यक्ती आपल्या जीवनात येतात पण आपल्या हातून जर एखादी चुक झाली तर त्या चुकांवर पांघरूण घालायला कुणीच नसते.ती फक्त एक आईच असते जी आपल्या चुका लपवत असते.आपल़ कुठतरी केललं पुण्य असते ते आपल्याला आईच्या रूपात बघायला मिळते. शेवटच्या श्वासापर्यंत आई हाच शब्द आपल्या तोंडून निघत असते.आईशिवाय जीवनातील सुख,समृद्धी व्यर्थ आहे.जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगात ही आईच सोबत असते.
आईची माया असते आभाळाएवढी
आई शब्दातच आहे अमृताची गोडी..
वेळ पडली तर आई स्वतः उपाशी असते.पण लेकरांना घास भरवते.आई आपल्या मुलांसाठी वेळ प्रसंगी प्राणाची आहुती पण देण्यास तयार असते.कुभांर मातीच्या निर्जीव गोड्याला जस आकार देतो त्याच प्रमाणे आई आपल्या सजिव गोड्याला(मुलाला)आकार देत असते.तीच्या मध्ये कधीही लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव नसते.
शब्द शोधतांना आईसाठी
शब्द पडतात अपुरे
तीच्या महान कार्याला
कधीही नका झुगारू रे...
आई होती म्हणून आपणं आज हे सुंदर विश्व पाहू लागलो.आई शिवाय या जगात आपले म्हणनारे कुणीही नसते.आणि आई सारखे सुंदर नाते कुठेही पाहायला मिळत नसते.आईचं काळीज हे समुद्राच्या लाटेप्रमाणे विशाल असते.मुलांचे सुख,दुःख त्यांच्या चुका आई नावाच्या या समुद्रातच धुतल्या जाते.आई या दोनच शब्दाने अख्या विश्वाला मोहीत केलं आहे. आई ही परमेश्वराच दुसरं रूप आहे. आई शब्दांत आभाळएवढं सामर्थ्य आहे. आपल्या घराचा आत्मा आईच असते.आईची महती सांगायला शब्द अपुरे पडतात. संपूर्ण आयुष्यात आईची सेवा करायला मिळेल हीच देवाजवळ प्रार्थना करा.कारण यापेक्षा आपल्या जीवनात मोठ पुण्य कुठलही नसते.
