“
तुझा तुलाच पुन्हा शोध घेईचा आहे.
तुझ्यातील तू हरवलेली पुन्हा शोधायची आहे.
येतील संकटे पण तुला धीराने तोंड देईचे आहे.
तुलाच त्यातून तुझं अस्थित्व टिकवायचे आहे.
स्वतःचा स्वाभिमान जपून या समाजात मिरवायचे आहे.
टीका करणाऱ्यांकडे तुला दुर्लक्षित करायचं आहे.
पुन्हा एकदा तुला स्वछंदी जगायचे आहे.
या मोकळ्या आकाशात पंखात बळ आणून पुन्हा विहार करायचा आहे.
तुला पुन्हा नव्याने स्वतःला गवसायचे आहे.
”