कठोर परिश्रम तुम्हाला समर्थ्यशाली बनवते, सामर्थ्यशाली मनुष्य हा नशिबात नसणाऱ्या गोष्टीही जीवनात मिळवतो म्हणून सामर्थ्यवान बना. तुम्हीच तुमचं नशीब लिहा.
"तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!"त्यामुळे लोक काय म्हणतील," त्यापेक्षा तुला काय करता येईल याकडे लक्ष दे...!
आयुष्य खूप अडचणी, संकटानी भरलेले आहे. पुढे जाताना रस्त्यावर काटेच काटे दिसत आहेत,असं वाटत असलं तर दृष्टिकोनाची खिडकी उघडा नक्कीच मार्ग मिळेल.
अलक स्वयंपाक काय करायचा...? असं सासूबाईना विचारून ती कामाला लागली. अगदी आनंदाने, प्रेमाने कुटुंबासाठी स्वयंपाक करत होती.तिच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्वजण धावत आले. तिला दवाखान्याण्यात आणताच तिच्यावर ट्रीटमेंट सुरु झाली. गरम तेलाच्या चटक्याने पूर्ण हात तिचा फोडाने भरला होता. इकडे सासूबाई मात्र कुठून मिळाली ही आवदसा म्हणून खापर फोडत होत्या.
" कष्ट हा एकच पर्याय आहे प्रसिद्धीसाठी. तेव्हाच ती फुलांच्या सुगंधा सारखी दाही दिशा आसमंतात पसरते. तेव्हा अहंकार न येऊ देता पाय जमिनीवरच रुजवून ठेवणे गरजेचे असते.