“
सहज बघितले कोऱ्या कागदाला....,
तो म्हणाला का रे मला विमान बनवून उडवत नाहीस...??
मी म्हणालो, अरे अल्लडपणाचे ते आता दिवस सरले.
तरुणाईच्या वयाने घाव घातला आपल्या मैत्रीत...!
पूर्वी किती तुला माझ्यासाठी वेळ होता.
तू रोज मला भेटायचास.
माझं विमान घेऊन दिवसभर भटकत राहीचास.
हल्ली माझ्याकडे तू पाहतही नाहीस.
जाता जाता एक सांगून जातो,
आकाशाला गवसनी घातल्याशिवाय मागे सरू नकोस.
आयुष्यात हार कधी मानू नको
”