STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मोगरा......

मोगरा......

1 min
204

आवडतो चंद्रावाणी मुखडा लाजरा 

सुगंधीत तू राणी माझ्या प्रेमाचा मोगरा......


तुझ्या सावळ्या रूपात मी झालो वेडा 

लई भारी तुझ्या नकट्या नाकातला खडा 

लाखात एक दिसतो वेणीत शोभून गजरा.....


लबाडं गोष्टीत तुझ्या इतका मी हरवलो 

तुझ्या प्रेमातं मी माझं सारं जग विसरलो 

नयन नशिले माझ्या आठवणीच्या सागरा.....


साध भोळ रूप तुझं पाहून झालो फिदा 

काळजाला लागली गं तुझी गावरान अदा 

तुला हसताना पाहून झाल्या वेड्या नजरा......


संगम पासून तू कधी जाऊ नकोस गं दुरी 

तूचं माझ्या जगण्याची आस माझी तू परी 

आपल्या प्रेमाचा आज दिवस करू साजरा......



साहित्याला गुण द्या
लॉग इन