मी विचार.....
मी विचार.....
1 min
199
मी का इतका लाचार
कुणाचा करू मी विचार.....
अंधारात माझं जीवन
मी फिरतो का वन वन
केले मी किती कष्ट फार....
लागली मनाला हूरहूर
माझं मनं करे गुरगुर
हरलो पडलो मी गार....
केला ना कुणाचा हेवा
इतकं दुख का मज देवा
भावना झाल्या माझ्या ठार....
ठेवलं ना डोक्यात काही
मला आज कोण पाही
उरलेत दिवस माझे चार....
