STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

गोळा गाव...

गोळा गाव...

1 min
199

अगावं राणी आहे 

तुझा किती स्वभाव 

का उगीच तू करत

आहेस गोळा गाव...!!धृ!!


तिखट मिरची तुझे 

आहेत तिखट बोल 

मनात तुझ्या काळ 

करू नको तू झोल 

किती वाढला आहे 

तुझ्या रुबाबाचा भाव...!!१!!


माझ्या सारखे तुला 

रोज भेटतात किती 

साधा भोळा आहे 

कळेना तुझी नीती 

लबाड बाता तुझ्या 

मी करेना घूमजाव...!!२!!


माझ्या मागे का तू

अशी लागली आहे 

अगं माझ्यासाठीच 

मी रात्र जागली आहे 

इतका बरा नाही राग 

मी देईना तुला वाव...!!३!!


वेळ नाही माझ्याकडे 

तू करू नकोस वाद 

कधी करत नाही 

तुझ्या सारखीचा नाद 

किती लावायची आहे 

तुला आग गावात लाव...!!४!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन