STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

दुःखाचं नीर.......

दुःखाचं नीर.......

1 min
195

झूकेल ही दुनिया एक दिवस माझ्यापूढे 

पापण्यावरचं वाळून जाईल दुःखाचं नीर..!!धृ!!


वेड्या जगाने होऊ दिलं ना परकं

मी ही कधी हो मन केल ना बारकं

डोळ्यांनी ना कधी ही अश्रू गाळले 

मनाला दिला आहे मी मायेचा धीर...!!१!!


ईमानदारीची हो सदा ठेवतो मी नियत 

समोर दिसतं आहे सुखाच्या शब्दांची रयत

दिलेला शब्द पाळला नेहमी कलेजा चीर..!!२!!


मुखातून निघत आहेत सुखाचे बोल कडू 

पाहून मला माझं आज दुःख लागलं रडू 

मजेत खातो मी पोटभरून सुखाची खीर...!!३!!


सारं दुःख हो आज बाजूला सारून गेली

आली हो आली आली माझी वेळ आली 

जग म्हणेना आता तू एकटा फिर...!!४!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन