भांड
भांड
1 min
415
भांडा कार्यकर्त्यानो भांडा
घेऊन काठ्या कुराडीचा दांडा
तुमची तुमच्या नेत्यावरची
भक्ती दाखवत लोकाला
विसरून गेलात त्याच्यापुढं
तुम्हीं स्वतःच्या बापाला
थोड्या थोड्या मुद्यावरून
भांडता तुम्हीं कार्यकर्ते
अनं तिकडे पदावर बसून
मज्जा मारती राजकर्ते
सारे नेते एकमेकांनचे मित्र
कोन विरोधक कोन सत्ताधारी
करतो कुणाची भक्ती आपण
सोडा रं ही राजकीय बीमारी
