मैत्री ही जशी रक्तसंबंधाने मिळत नाही तशी रोजच्या समोर असण्याने ही घट्ट बांधली जात नाही. . एकमेकांशी एकरूप होण्याचा पहिला धडा येथेच मिळतो आणि आयुष्यातले अनेक निर्णय येथेच फायनल होतात. . फक्त गरज असते ती वैयक्तिक व्याप, पद, पैसा, प्रतिष्ठा यांचं गाठोडं बांधून मनाच्या तळाशी सोडून द्यायचे आणि मैत्रीच्या सहवासात मनमुराद जगण्याची. म्हणजे मग तळाशी सोडून दिलेलं गाठोडं अलगद सोडवायला एक निष्पाप जागा मिळते.