बापाच्या विद्यापिठातली शिकवणी
ज्या प्रमाणे आपल्याला स्वच्छतेची गरज असते,
त्याप्रमाणे, काळ्या आईला सुद्धा निटनिटके ठेवावे लागते...
दुराचार सुरुवातीला असाच बोचरा - गोंडस असतो,
कालांतराने अक्राविक्राळ रूप धारण करतो,
मग सरळमार्गी चालूच देत नाही,
अगदी,
.
.
बांधावरच्या बोराटीच्या झाडाप्रमाने....
म्हणून असे पीक मुळा सकट उपटून फेकले पाहिजे,
विचारांचे असो की शेतातले......