अस म्हणतात घरातल्या स्त्रीच्या आचरणावर घराच्या प्रगतीचा आलेख अवलंबून असतो.पण मी म्हणेल घरातल्या पुरुषाच्या आचरणावर घरातल्या स्त्रीच्या प्रगतीचा आलेख अवलंबून असतो.
पुस्तक बळ देतात घावघात सोसण्याचे
आयुष्यातल्या अंधाराला उंबरठ्यातच रोखण्याचे
कला अशी पाहिजे जी लाखो लोकांशी बोलू शकेल
स्वकीयांनीच घातले जेव्हा वार पाठीमागून
अभिमन्युसारखा मी त्यांच्याशी लढलोच नाही
रानात माणसाच्या माणुस भेटलाच नाही
गर्दीत त्या पशुच्या मी थांबलोच नाही
येता मनी क्रोध
प्रयत्नाने बसावे शांत
भावनांची ती लाट
आपसूक माघारी जात
एकमेकांना गंडवा गंडवी यालाच मूर्खपणा म्हणायचे
इंग्लिश मध्ये तर हा सण झाला याला एप्रिल फुल म्हणायचे
वय वाढल म्हणून अनुभव येत नसतात
कमी वयात पण बरेच वाईट दिवस पाहायला मिळतात
परिवर्तन त्रासदायक नसत तर परिवर्तनाचा विरोध त्रासदायक असतो.
ओळखून नवी संधी
देवू स्वप्नांना आकार
जिद्द लावूनी पणाला
करू स्वप्नांना साकार