ध्येय हे जीवनाचे वाटे मज तू असावे सदैव सोबतीला माझ्या..! जणू स्वप्न माझे ध्येय पूर्तीस यावे.. तू असावे तिथे मी असावे.. ध्येय हे आयुष्याचे सार्थक व्हावें..! कितीदा नव्याने तुला आठवावे..कितीदा हसावे कितीदा रडावे...तुझ्याच साठी कितीदा मी मरावे... तू असण्याचे ध्येय माझे फक्त स्वप्नं न्हवे सत्यात यावे!!
एक रोप मैत्रीचं माझ्या अंगणी असावं, फुलांना बहर येऊन सर्वत्र दरवळावं. रोज हे रोपटं उंच उंच जावं, गगनभेदूनी विश्वातची एक आदर्श निर्मीत अजरामर व्हावं!!
विश्वास ही अशी एकमेव आशा आहे जी कायम आपल्या सोबत असेल तर मग कुठलेही असाध्य ही साध्य करण्याचे सामर्थ्य या दृढ विश्वासात सामावले आहे.
गंध चाफ्याचा दरवळला सर्वत्र, हळूच वाऱ्याची झुळूक... स्पर्श सुमनाचा हलकासा, रातराणी करे काहीतरी कुजबूज... चंद्र ढगाआढ,चांदणे करती लुकलुक..... सारे आतूर बघाया ही रात्र एक ...
स्व्नसुंदरी असे ती असा भास होत आहे, कल्पना की वास्तव हे सारे खेळ वाटत आहे . मी असेल सोबत तुझ्या फक्त हात तुझा मागत आहे .