भले कुछ दिनों का ही सही,
मेरा भी सफर रहा सुहाना;
क्या करू शिकायत किसीकी,
जब रुठा हो मुझसे सारा जमाना...!
उम्मीदें ही नही किसीसे अब,
क्या ही करेंगे गिले-शिखवे?
जिना हम भी सिख गये;
अबसे वो जितने, हम भी उतने...!
विचारलेच तिने जर,
तर मी यावेळी नाहीच म्हणेन;
परतफेड वा अहंभाव नव्हे तर,
केवळ तसाच तिला बहुधा पुन्हा कळेन!!!
कशाचीही कमी नाही,
हीच बहुधा खंत आहे;
इच्छाच नसावी बहुतेक,
अन्यथा कुणा येथे उसंत आहे?
दडपण आमचं येतं म्हणाले,
वेळ नव्हता ज्यांच्याकडे;
सहनशीलता आमुची तपासली,
आणि निघून गेले देऊन धडे.
काय तक्रार कुणाची करावी,
वेळ आहे तरी कुणाकडे?
अर्ध्यात प्रवास सोडतात इथे,
कुणाचे कुणावाचून अडे?
मागितला वेळ तुझा,
नेमकी तेव्हाच तुला सवड नव्हती;
सोबत हवी होती कायमची,
अपेक्षा बाकी काहीच नव्हती.
जगलो नाही कधीही स्वतःसाठी,
अपूर्णच राहिलो नेहमी जिच्यासाठी;
जमले नाही देणे एक संध्याकाळ तिला,
जपत राहिलो एकतर्फी तकलादू सारी नाती.
वेळ मागितला सोबत म्हणून,
नातं जुनं, कुणी तोडतं का?
समजायचं, समजून घ्यायचं म्हणत,
असं अर्ध्यात कुणी सोडतं का?