Sanjay Gurav
Literary Colonel
151
Posts
26
Followers
16
Following

एम ए बी एड (मराठी). कविता लिहायला आवडतात. अनुभव लेखन व कथा लिहायचा प्रयत्न. वाचन अधिक आवडते.

Share with friends

अक्षय स्मित पाझरते रोज दिसूदे ओझरते उनाडाची कळी या स्पर्शाविन गं मोहरते..

मन द्यायचं हुल तेव्हा लागायची तुझी चाहूल अडखळायचीत पावलं अशी पडायची भूल..✍️ ©® सदासन

तुला बरसताना बघून जातो पुन्हा एकदा जगून सरीमध्ये भास तुझाच जरी गेली आहेस निघून. सदासन

तिचा नखरा माझी चारोळी ओठी हासू बट रुळते भाळी घायाळ करते ती रंगेल खळी अशी ही तिची अदाच निराळी सदासन

लव्हाळा नव्हे लवचिक जशी क्षणभंगुरशी पाती रंग बदलती दुनिया आणि अशीही बदलणारी नाती

सुने चंद्रभागा तीर नाही आकाडी पूर विठू तुझ्या आठवात फुटतो रे माझा ऊर. सदासन

भरलेलं आभाळ सर्वदा तुझ्या आठवणी मांडत नाही भरलं,सांडलं,विरलं तरी मीही फारसा भांडत नाही सदासन

चुकली वारी एकदाची सुनी सुनी एकादशी एकटा राऊळी विठ्ठल भक्ती कोंडली उराशी

पुन्हा नव्याने मांडू काही थोडे वेचू जुने सांडू काही नव्या वेशी ओलांडू काही जरा प्रेमाने मगभांडू काही


Feed

Library

Write

Notification
Profile