नात्यांचा गुंता मोठ्यांपेक्षा
लहान मुलंच सोडवू शकतात...
जिथे नात्यांचा उलगडा होत नाही तिथे,
ही मुलं ती सहज स्वीकारून,
हव्या त्या नात्यात बसवूनही टाकतात
आणि आपण...फक्त नाव काय द्यावं शोधत रहातो.
रुपाली पाटील...
खिडकीच्या सळईला गंज लागला
म्हणून खिडकीने दुरावा नाही धरला..
उलट आज ना उद्या रंग दिला जाईल आणि
सगळं काही व्यवस्थित होईल हीच आशा धरली..
आणि आज..
सकाळी सूर्याच्या किरणांबरोबर
गंजलेल्या सळईला नवीन रंग मिळाला..
खिडकीच्या सावरण्याने, आशेने..
एक नवी पहाट झाली.
रुपाली पाटील...