चांदण्या रात्री थोडे फिरू नयनांची भाषा वाचत बसू. विसरून क्षणभर ऐकमेकांस झेलेल्या सुखदुःखाच्या सरीत हसू. श्रीमती.संजना कामत.(मुंबई)
अशा हया रम्य स्थळी, भेटीचे जुळून आले क्षण. प्रतिबिंब पाण्यातले पाहून, व्दिगुणित होऊन भरले प्रेमाने मन. श्रीमती.संजना कामत.(मुंबई)
मनातील सागरलाटा, की विचारांचे हे तुफान. उचबळून नभी घेई भरारी, स्वप्नझेपांच्या ह्या लहरी. श्रीमती.संजना कामत.(मुंबई)
वेडे समर्पण करण्यात साठी, लागते जिगरबाज छाती. लढले वीर जे मातभूमीच्या, रक्षणास विडा घेऊन हाती. श्रीमती.संजना कामत.(मुंबई)
अहंम सरता अहंम अहंकारी मळभ, स्वच्छ निर्मळ होईल तनमन. भेटेल धुक्यात हरवलेल्या वाटा, सुख समाधानात बहरेल जीवन. श्री.संजना कामत.(मुंबई)
कास्तकरी संकट येती किती अचानक, दृढ निश्चयांची स्वप्न झेप घेत. आव्हानांचा सामना जिंकत, कास्तकरी हा सदा मार्गक्रमत. श्री.संजना कामत.(मुंबई)
फुलपाखरा मन मोहते सुंदर फुलपाखरा, सासर,माहेर क्षणात पोहचू कसे. क्षणभर थांबजरा देना पंख तुझे, मायेच्या कुशीत प्रेम श्वास दिसे. श्री.संजना कामत.(मुंबई)
पायवाट आत्मनंदाची होते भेट, तुडविता संघर्षाची वाट. सुखी संसारा चढे पायरी, आत्मविश्वासाची पायवाट. श्री.संजना कामत.(मुंबई)