सायंकाळी आज पसरला
सहज मंद हा गारवा
आश्चर्यदायक दारी उभा
प्रिय मज ऋतू हिरवा
शिक्षकांस मानावे वा निसर्गास मानावे
कळत नाही मला गुरु कोणास म्हणावे
जीवनाच्या प्रवासात मार्गदर्शक असते आई
विश्व हेचि गुरू मानूनी क्षणोक्षणी स्मरावे
══━━━━✥◈✥━━━━══
प्रसंगी तीक्ष्ण आणि कणखर
आहे सुंदर आणि देखणी,
कवि वा लेखकांची ही अर्धांगिनी
सत्यवादी ही लेखणी
सावंत तातोबा नंदकुमार रेश्मा