कसे सोडवावे जुने पेच ते आयुष्य रोजचे असे तेच ते सौख्य सटकते पाऱ्यासमान वाट्यास दुःख नित्याचेच ते पंडित वराडे, औरंगाबाद
तुझे हसू जीवन जगायला उभारी देते, दुःखाला विसरायला लावते, जीवन दुःखमय नाहीच नाही तू हसतेस तेव्हा ते सुंदर वाटते पंडित वराडे, औरंगाबाद १८.०६.२०२१
सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवरायांचा राज्याभिषेक झाला हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज चौमुलखी डौलाने झळकू लागला पंडित वराडे, औरंगाबाद ०६.०६.२०२१
भाग्यवान जीव ज्याच्या नशीबा मध्ये आहे आई कुशीत ऊब, स्तनात दूध बाळाचे भरणपोषण होई पंडित वराडे, औरंगाबाद
राजमाता अहिल्याबाई होळकर प्रजावत्सल, राजकर्त्या कणखर मंदिर जीर्णोद्धारी खरी शिवभक्त सात्विक, धर्मशील आणि धुरंधर पंडित वराडे, औरंगाबाद ३१.०५.२०२१