तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि काय करायचं आहे हे माहीत असणे
कोणतीही टीका गांभिर्याने घ्या पण वैयक्तिक नको कारण टीकेमधील सत्यता आणि अचूकपणा तपासणं गरजेचं आहे. अन्यथा तिच्याकडे दुर्लक्ष करणंच बरं
धावपळीच्या जीवनात नात्याची कदर तर नाहीच होत , परंतु नात्याची ओळखही आपण विसरत चाललो आहोत --------- गरज आहे ती पुन्हा पुन्हा एकमेकांमध्ये रंगीबेरंगी धाग्यांनी गुंफण्याची !
महागाई एक आजार आहे, याच्यापासुन स्वतःचा बचाव करा, कमी खा आणि कपडे फाटके घाला, शक्य असल्यास पायी प्रवास करा, इंधन असलेल्या वाहनांचा वापर करु नका, लक्षात ठेवा...आपल्याला या महागाईशी लढायचे आहे...सरकारशी नाही...