अवखळ लाटांनी स्वच्छंदी भटकावे आणि सुखद विसावे त्या निर्मळ किनाऱ्यापाशी..पण त्या अवखळ स्वच्छंदी लाटांना कुठे होतं ठाव की, किनाऱ्याशी एकरूप होण्याचा अवधी तो कितीसा विरळ आणि अस्पष्ट असेल,तरीपण न हिरमुसता अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात,त्याच किनाऱ्याच्या अंतकरणातील क्षणभंगुर निर्माल्य ओढीपायी,विसावतात घेऊन एक आशेचा नवा किरण,ना दोष त्या किनाऱ्याचा ना त्या लाटांचा,असेल विधिलिखित कदाचित पवित्र सहवासाचा.