सर्वां आवडे चॉकलेट, तशी ही अप्रतिम भेट चॉकलेटची अविरत गोडी जिभेवर रेंगाळते थोडी भिडे ह्रदयात थेट दयायला करू नका लेट हॅप्पी चॉकलेट डे 🍫 सौ. शीतल ईशी (मनस्वी कलाकार)
आधुनिक म्हण:- वाण्याने दिली ओसरी, हळूहळू पाय पसरी... आता कायमची माझी झालीओसरी. सौ. शीतल ईशी (मनस्वी कलाकार)
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचे आमचे सेम नसते. कुणाचे भारतमातेवर, कुणाचे इतिहासाच्या गाथेवर, कुणाचे अभ्यासावर, कुणाचे अथक परिश्रमांवर, कुणाचे निसर्गावर, कुणाचे जीवन ध्येयावर... प्रेम म्हणजे प्रेमच असते.... सौ. शीतल ईशी (मनस्वी कलाकार)
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. सौ. शीतल ईशी ( मनस्वी कलाकार)