आजचा सुविचार "गोड" गोड चेहरा आपल्यात घमेंड निर्माण करतो.एकटे पाडतो. पण स्वभावातील गोडवा चिरकाल सोबतीला राहतो.आजूबाजूला गोतावळा जमा करतो. ©️ ®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
"कधी" कधी कधी परिस्थिती बदलता येत नसेल तर,आपली मनस्थिती बदलावी म्हणजे परीस्थिती मुळे घडणारं संभाव्य धोके तरी टाळता येतात. ©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
जबाबदारीची अशी व्याख्या आहे कि, जी वय बघत नाही.जबाबदारीला पेलण्याचे सामर्थ्य आहे का हे ही तिला दिसत नाही.साध्या स्वभावाला जबाबदारी त्रास पण देते.जबाबदारी हि व्याख्या फक्त आपले अस्तित्व विसरून जगायला शिकवते. ©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
आजचा सुविचार "उत्तर" आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत काही काही प्रश्नांना उत्तरे नसतात. ते अनुत्तरित आहेत हे गृहीत धरुनच आयुष्याचा पेपर सोडवावा लागतो. ©️®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
शिवबाळाने जिजाईंच्या सुसंस्काराचे अनुकरण केले म्हणूनच शिवछत्रपती घडले.आजही अनेक जिजाईं तेच संस्कार आपल्या बाळावर करण्यासाठी आहेत दक्ष पण किती बाळे आहेत शिवछत्रपतींच्या वाटेवर हा अनुत्तरित प्रश्न??..
"संस्कार" संस्कार हा दागिना असा आहे.कि, तो अंगावर घालून आपण सुंदर दिसण्याची गरज भासत नाही. तो आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची शोभा वाढवतो. ©️®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे