गुलाब
दिले मला अस्तित्व तूम्ही
करून फुलांचा राजा
बनवून प्रेमाचे प्रतीक
पंधरा दिवसांचे आयुष्य माझे
कुणी चुरगाळले,तर कुणी तोडले
माझ्या आयुष्याशी खेळून
का करतोस बहाणा
माझ्या समीप येण्याचा
का तुझा लडिवाळपणा
मौसम गुलाबी थंडीचा
©®डॉ सुजाता कुटे
गर्द धुक्यांच्या छायेत
तुझी प्रीत मी स्मरते.
स्पष्ट पैलू पाडून
तुझा चेहरा बघते.
©®डॉ सुजाता कुटे
आभास तूझ्या प्रीतीचा
मन प्रफुल्लित करतो
जणू दरवळ रजनी गंधाचा
सुवास देऊन जातो.
©® डॉ सुजाता कुटे