संध्याकाळी थकून भागून घरी आल्यावर चिमुरड्या लेकीने धावत धावत येऊन घट्ट मिठी मारली आणि गोड गोड पापा दिला आणि माझा दिवस गोड गोड झाला !!
तिचा थरथरता हात हातात घेऊन अलगद तिला मिठी मारली आणि तिनेही हळूवारपणे तिचा मुलायम हात केसातुन फिरवला, सर्व दुःखं क्षणात विरली आणि तेव्हा जाणवलं की खरं स्वर्ग सुख आई फक्त तुझ्याच मिठीत आहे!!
जेव्हा सर्व जग सुंदर दिसते, दिलं शायराना होते आणि टेडी वर ही कविता सुचते , तेव्हा नक्कीच प्रेमाची कळी खुललेली असते.
त्याने तिच्या नजरेत रोखून बघत विचारलं, तुला कुठलं chocolate आवडतं? Brown की white. chocolate चं तर फक्त निमित्त. ! त्याच्या नजरेला नजर भिडल्यावर ती स्वत:च chocolate सारखी विरघळून गेली....
आयुष्य म्हणजे कसं अगदी dark chocolate सारखं, थोडं गोड, बरेचसं कडु, थोडं softy आणि velvety,. ज्याला जी चव आणि गुण आवडेल त्यात त्याला झुलवत आणि घोळवत ठेवणारं अगदी पुर्ण विरघळेपर्यंत!