उधळून आयुष्यात अनेक रंग
सुखदुःखात होऊनी दंग....
सत्कार्यात क्षण वेचूनी
आयुष्य लावू सत्कारणी...
आयुष्य उलगडे अनेक रंग
सुख दुःखात होऊन दंग....
जीवनी येई नवी उमंग
होईल मी इंद्रधनुसम विहंग....
रेखा गावीत/बागुल
सुख दुःखाचा करता ताळमेळ
जीवनी उमलता रंगाचा खेळ...
आयुष्यात उमटे हे इंद्रधनू
मी पण पूर्ण होई जणू...
सृजनाचे अनेक रंग
जीवनात येई नवीन उमंग...
भासे मला असे आयुष्य
जणू सप्तरंगी इंद्रधनुष्य....
माँ..
सबसे प्यारा ,मेरे माँ का आँचल।।
प्यासे को देता है, जैसे जल।।
बच्चो के हर बात को लेता संभल।।
माँ ,मेरी प्यारी माँ।।
।
आई.
देवघरात जशी तेवते समई...
तशी मंद ज्योतीसम माझी आई.
होणार नाही कधी उतराई..
संपणार नाही तुझ्या माझ्या प्रेमाची नवलाई...