जे आपल्याकडे आहे त्याच्यात आनंद आहेच पण जे नाही त्याचं दुःख करत नाही बसायचं. समाधानी रहायचं. नाहीतर जे आहे त्याचा सुद्धा आनंद भरभरून घेता येत नाही __पुजा ⚘️
नको असलेलं नातं एका झटक्यात तोडून टाकावं. उगाच प्रतिक्षेच्या धाग्यात जखडून आशेचा गुंता करून ठेवू नये. नातं सोडवायला कठीण होऊन बसतं.. __पुजा ⚘️
प्रत्येकाने आपल्या भोवती एक जाळं विणलेलं असतं. किंवा मग नियती ते जाळं वीणते प्रत्येकाच्या भोवती.. ते जाळं कधी कधी हवंसं वाटतं तर कधी नकोसं. पण त्या जाळ्यावर बसून स्वच्छंद झुलता यायला हवं आणि हे ज्याला जमतं त्याच्यासाठी मोकळ आकाश खुणावतं आहे. ...मनसोक्त बागडण्यासाठी..आनंदासाठी.. __पूजा ⚘️
नेहमीच समज गैरसमज, तर्कवितर्क च्या लाटेवर तरंगण्यापेक्षा निर्णयाच्या किनार्यावर बसून समाधानाची लाट अनुभवावी... __पुजा ⚘️
शून्यातून निर्माण करणे आणि ते वाढवणे म्हणजे सोप्पं. पण ते टिकवून ठेवणे अतिशय कठीण. मग ते एखादे राज्य,साम्राज्य, व्यवसाय असो किंवा नाती... सांभाळून टिकवून ठेवणे कठीण. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि संयम समजूतदारपणा साधावे लागते. __पुजा⚘️
लाकडाची वस्तू आतून कितीही पोखरलेली असली तरी ते बाहेरून टणक आणि कणखर वाटतं. आतून डोकावून बघणाऱ्याला कळतं ते आतून किती पोखरले आहे ते. __पूजा⚘
प्रत्येक जण दिखावा करत असतो. कुणी प्रेमाचा, कुणी गरजेचा कुणी गुंतण्याचा तर कुणी अलिप्त रहाण्याचा..कुणी समाधानाचा कुणी श्रीमंतीचा, कुणी काहीही नसल्याचा.. कुणी आनंद असल्याचा तर कुणी आनंदी असण्याचा.. __पुजा ⚘️