तू नकोच बोलू काही...
मी तसेही ऐकत नाही...
प्रेमाची ही तर भाषा...
मज शब्दांत उमगत नाही..
मैफिल भंग पावते जेव्हा चुकते लय तालाची...
गोडी निघून जाते नाळ तुटता मातीशी...
भाषा फक्त श्रीमंतीची, नाही कदर भावनांची...
नसते सरळ रेषा, माणसा कुठल्याच नात्याची...
भयंकर जलप्रलयाचा मी तांडव पाहिला होता..
घोंगावत वादळाचा हुंकार ऐकला होता..
झाडे कोसळलेली..तृणफुल वाचले होते..
अहंकाराचा उन्माद असा ...आज संपला होता..
.