वेळेचा गुलाम बनून
मजा आहे भेटण्याची
तीच तर वेळ येईल
तुझ्या माझ्या एकांताची
किर्ती बोरकर, जळगाव
माणसाच्या जीवनात
नशिबाचा मेळ आहे
विश्वासावर तुझ्या माझ्या
जीवनाचा खेळ आहे
~किर्ती बोरकर, जळगाव
शब्दातूनी जागविते
मनामध्ये अभिलाषा
नवे नवे गीत गाते
होई शब्दांचीच भाषा
~किर्ती बोरकर,जळगाव
वंशाचा दिवा म्हणून का
विझवता पणती दिव्याची
का देत नाही एक संधी
मुलीला जीवन जगण्याची
दिवस आणि रात्र संपली
सोडा सगळे जुने विचार
वंशाचा दिवा म्हणून मुलीचा
करा आनंदाने स्वीकार....!
~किर्ती बोरकर,जळगाव
आज तुझ्यासाठी लिहायला
माझे शब्द अपुरे पडत आहेत
भावनांना व्यक्त करण्यासाठी
शब्द शब्दानाच शोधत आहेत
~किर्ती बोरकर, जळगाव
आयुष्यात तुझ्या
जागा माझी हवी आहे
माझ्या सोबतीला
साथ तुझी हवी आहे
~किर्ती बोरकर,जळगाव