STORYMIRROR

#RangBarse

विजेते पाहा

मित्रांशी सामायिक करा

यंदाच्या होळीत, रंगीबेरंगी रंगात न्हाऊया!

कला म्हणा वा उपचार पद्धती म्हणा, आयुष्यात रंग भरण्याने सर्व काही नक्कीच अधिक चांगले होऊ शकते!

होळी, रंग, भावभावना आणि आनंदाचा सण! प्रत्येक रंग भारतीयांच्या मनात विशिष्ट अर्थ कोरणाराच! उदाहरणार्थ, लाल रंग विवाहाचा, प्रजननाचा, प्रेमाचा, सौंदर्याचा; निळा रंग, हिंदू धर्मातील पूज्य दैवताचा अर्थात श्रीकृष्णाचे प्रतीक आहे. हिरवा रंग अर्थातच नवी सुरुवात, पिकांची कापणी वगैरेचे प्रतीक आहे.

म्हणूनच यंदाच्या होळीत, वसंत ऋतुरंभी आपल्या दैनंदिन आयुष्यात आनंद, समृद्धी आणि शांततेचा रंग भरण्यासाठी स्टोरीमिरर सादर करत आहे #रंग बरसे / #RangBarse!

चला तर मग, विविध विचारांचे रंग घ्या, आपली सर्जनशीलता मुक्त बहरु द्या आणि आकर्षक बक्षिसे मिळवा!

नियम :

  • सहभागी स्पर्धक होळीच्या संकल्पनेवर आधारित कथा आणि कविता सादर करु शकतात.
  • संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
  • सहभागी स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करावी. साहित्य रचना सादर करण्यासाठी संख्येची कोणतीही मर्यादा नाही.
  • आपल्या साहित्य रचनेमध्ये #रंगबरसे / #RangBarse टॅग वापरावा.
  • साहित्य रचनेसाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही.

साहित्य प्रकार :

कथा

कविता

बक्षिसे :

  • शीर्ष तीन कथा आणि कवितांना रु. 250 मूल्याचे स्टोरीमिरर व्हाऊचर मिळेल.
  • विजेत्यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल.
  • सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल होळी कार्ड मिळेल, जे ते त्यांच्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये सामायिक करु शकतात.
  • प्रत्येक भाषा आणि साहित्य प्रकारातील शीर्ष 30 साहित्य रचनांचे ई-बुक प्रकाशित केले जाईल.

साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : 12 मार्च 2021 ते 31 मार्च 2021

निकाल : 28 एप्रिल 2021