STORYMIRROR

#समृद्ध कोकण

विजेते पाहा

मित्रांशी सामायिक करा

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले रम्य मनोहर ,कोकणची भुमी ही देवतांच्या पदस्पर्शाने,पावन झालेली..त्या मुळे भुमीला वेगळा असा इतिहास आहचे.हे वेगळ सांगायला नको,

समृद्ध कोकण अस हरीत द्रव्याने नटले कोकण,हे धरतीवरचा स्वर्ग...

पूर्ण सुष्टी हीरवी गार सदा टवटवीत असणा-या लता वेली ,त्यावर ऊमललेली नाजूक सूदंर फुले,अश्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलानी बहरलेल्या वनात तो पांडूरंग स्व:ता कणा कणात विराज मान असल्याची जाणीव होते. 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,यांचा इतिहास लाभलेले कोकण भौगोलीकरित्या सुखसोईनी समृद्ध , मालवण समुद्री बांधलेला समुद्रातील किल्ला,हा कोकणच्या वैभवात मोलाची भर टाकतो.. त्याच बरोबर या भूमीत साधू संत ओघाने जन्माला आले ही कोकणची परम पुण्याई. धरतीवर कूठे रान मेवा चाखायचा असेल,तर तो फक्त कोकणचा, हे कोकण सर्वांना हवहवस वाटणार नाही हे नवलच, ना का? परीपूर्ण सूखसोईने युक्त असणा-या कोकणातल सौदंर्य मात्र सहज कुणालाही आपल्या प्रेमात टाकते..

अशी कोकणाची कित्येक चित्रं तुमच्या मनामध्ये घर करून राहिलेली असतील. त्यातली तुम्ही काही अनुभवलीही असतील. त्यांनाच शब्दबद्ध करून कोकणचा पुन:प्रत्यय घेण्याची संधी घेवून आलो..

याच कारण आपल्यात लपलेल्या लेखकाला ,कविंना,उत्तेजन मिळाव ,हे एकमेव उदीष्ट..

साहित्य प्रकार :

कथा

कविता

चारोळी  

स्पर्धेचे नियम -

१.कथा कविता,चारोळी मराठीत सबमिट करता येतील.

२.* स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे अावश्यक आहे. स्पर्धक अनेक साहित्य रचना सादर करु शकतात, त्यासाठी संख्येची मर्यादा नाही.

३.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.

४.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

५.स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.                        

पुरस्कार :

*सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)

*सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)

* सर्वोत्कृष्ट ५० कविता,चारोळी एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

* सर्वोत्कृष्ट ५० कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील. 


पात्रता

स्पर्धेचा कालावधी- ८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१

निकाल- २८ मे २०२१

भाषा- मराठी

संपर्क- रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख )

मो: 9768065763.