STORYMIRROR

Vaishali Nikam

Others

2  

Vaishali Nikam

Others

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

1 min
659

जिजाबाई साहेब आईसाहेबांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला . तो दिवस होता दिनांक 19 फेब्रुवारी 1930 शुक्रवार. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाबाईंना झाला शहाजीराजांना झाला! पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला म्हणजेच भारताला झाला .बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले.शिवनेरीवर जन्म झाला म्हणून शिवाजी असे नामकरण झाले. जिजाऊ मोठ्या कौतुकाने त्यांना शिवबा असे म्हणत. अंगणात रांगत धडपडत शिवबा हळूहळू मोठा होऊ लागला. शिवाजीराजांचे गुरू म्हणून दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. त्यांच्या देखरेखीखाली शिवबा भालाफेक इ. तलवार यांसारखे सर्वच हत्यारे चालविण्यात प्राविण्य मिळवले.जिजाऊंच्या तल्लख बुद्धी प्रमाणे शिवबांनी गनिमी कावा सारखे बेत आखण्याचे तंत्र शिकून घेतले गरीब मावळे त्यांचे मित्र सवंगडी होते. शिवाजी राजांनी स्वराज्य उभारण्यासाठी सर्व मावळे नातेवाईक आणि सर्व जाती धर्माचे म्हणजेच बारा बलुतेदार यांचे शिष्टमंडळ स्थापन केले आणि स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 13 जून सोळाशे 74 रोजी रायगडावर झाला आणि ते सिंहासनाधीश झाले. थोड्याच कालावधीत त्यांनी स्वराज्य वाढवले. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल सोळाशे 80 शनिवारी रोजी झाला.


Rate this content
Log in