sachin Barve

Others

1  

sachin Barve

Others

असा मी घडलोःः..

असा मी घडलोःः..

5 mins
553


एस टी कामगार पाल्य ते ..आतराराष्ट्रीय खेळाडू प्रवास !


सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेला एस टी. कामगाराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय खेळाडू ही जिद्द, मेहनत, चिकाटी यांचा अद्वीतीय संगम औरंगाबादच्या ज्या नुकत्याच खेळाडूंना देण्यात येणार्‍या थेट शासकीय नौकरी यामध्ये जे 33 खेळाडू आहेत. त्यात स्वप्नील तांगडेच्या समावेश आहे. युवकांचा आयडॉल फेन्सींग (Fencing) तलवार बाजी क्रिडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केलेला स्वप्नील चा प्रवास व त्याच्या मनाचा घेतलेला वेध हे आजच्या तरुणाईला आदर्श व मार्गवत आहे. 


आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श हा फक्त मुर्ती, पुतळे यामध्येच मर्यादित स्वरुपात ठेवलो. पण त्यांचा वारसा असलेल्या कलागुणांना मात्र म्हणावे तसे आपलेसे केलेले नाही. अशाीच एक कला जी आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचायला हवी मात्र ती पाहीजे त्या प्रमाणात पोहोचु शकली नाही ती म्हणजे तलवार बाजी Fencing हा क्रिडा प्रकार.


अशा या खेळास करिअर म्हणून आपल्या मुलाकरता निवडणे व त्याकररीता आपले सर्वस्व पणाला लावणे हे डॉक्टर इंजिनियर अशा उच्च भ्रु संकल्पना व स्वप्नं पाहणार्‍या उच्चशिक्षित पालकांनाही लाजवेल असे कार्य एका एस. टी. कामगाराने पूर्णत्वास नेणे अशा या कार्याला व त्यांच्या जिद्दीलाही सलामः..


स्वप्नील तांगडे यांचे जीवन तसे हालाखीचे परिस्थीतीतच गेले असले तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांचे कार्य हे गरुड झेप घेणारे आहे. अगदि ईयत्ता 6 वी त असल्यापासुन त्यांचे मोठे दिवंगत बंधू यांची अशी ईच्छा होती की, स्वप्नीलने तलवार बाजीमध्ये आपले करिअर करावे. त्यांचे मित्र डॉ. उदय डोंगरे हे स्पप्नीलच्या आयुष्यातील आद्यगुरु ठरले. त्यांच्या बोलण्यातून सतत त्यांच्या प्रती आदरभाव व उल्लेख, वारंवार तो करत होता. B. com , B ped ,, पर्यंत शिक्षण घेतलेला हा खेळाडू M. ped. करतोय. 


अगदि ईयत्ता 7 वीत असताना ग्वाल्हीयर येथे होणार्‍या संब ज्यूनियर चॅम्पीयनशीपमध्ये 14 वर्षाखालील गटात त्यांनी आपल्या कामगिरीची चुणूक दाखविली तिथून यशाची घौडदौंड चालु आहे. ती आजतागायत अखंडपणे अविरत चालु आहे. दररोज सकाळी 02:30 ते 03:00 तास व रात्री 03:00 ते 03:30 तास त्याचा सराव चालु असतो. ही मेहनतच त्याच्या यशाचे गामक असल्याचे सांगतो.


 त्यामध्ये त्याने औरंगाबाद जिल्हा गुणवंत पुरस्कार 2011, छत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त खेळाडू 2014-2015 , रशिया वर्ल्ड चॅम्पीयनशीप 2014, थायलंड वर्ल्ड चॅम्पीयनशीप 2016-2017 मध्ये सहभाग घेतला असे अनेक पुरस्कार त्यांनी आपलया खेळामध्ये प्राप्त केलेले आहे. त्यांचा जीवनप्रवास व मेडल्स मोमेंटोज हे आपणासारख्यांना थक्क करणारे आहे.


हे सर्व करण्याकरता माझ्े आई सौ. कांताबाई त्र्यंबक तांगडे व वडील त्र्यंबक नारायण तांगडे व गुरु डॉ. उदय डोंगरे सर यांची नेहमीच साथ व पाठींबा लाभल्यानेच हे सर्व शक्य झाले असे सांगतो .


तसेच हा खेळ Fencing सामान्यजनतेपर्यंत म्हणावा त्या प्रमाणात पोहोचला नसल्या कारणाने तो तळागाळापर्यंत पोहोचवणे हे उद्दीष्ट असल्याचे व जास्तीत जासत ऑलिम्पीयाड खेळाडू तयार करण्याचे त्याचे स्वप्नं असल्याचे तो सांगतो त्याकरिता त्यांनी क्रिडा संकुल सुतगिरणी औरंगाबाद येथे 40 ते 45 विद्यार्थ्यांना कोचिंग करतो. 


हा खेळ निवडण्याचे तसे प्रमाण नसले तरी योग्य वय 7 ते 8 वर्षापासूनचे आहे. त्यामुळे त्या खेळाडूला 10,12,14 वर्षे वयोगटात खेळण्याची संधी मिळेल. 


बर्‍याच पालकांना Fencing हा खेळ म्हणजे मार जखमा लागेल अशी प्राथमिक दर्शनी भिती वाटते परंतु हा खेळ संपूर्ण इलेक्ट्रॉनीक असलेमुळे मार जखमा होण्याचे प्रमाण हे शुन्य टक्के (0%) असल्याचे ते सांगतात. 


दुसरी पालकाची अशी संकल्पना असते की हा खेळ महागडा व उच्च भ्रूंचा असतो परंतु तसे काही नाही. अगदी कमी दरामध्ये सेफ्टी कीट व तलवार (sword weapon) मिळते N2 कम्युनिटी सेंटर, प्रमोद महाजन क्रिडा संकुल हडको, एम. जी. एम स्कूल औरंगाबाद येथेही प्रशिक्षण चालत असल्याचे त्यांनी माहीती दिली . SAI (sports Authority of India) यामध्ये Fencing या क्रिडाप्रकाराचा समावेश आहे. मात्र हा खेळ महाराष्ट्र क्रिडा प्रबोधिनी मध्येही समावेश करावा. अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त केली. 


मुळचे भोकरदन ता. जि. जालना येथील असलेले तांगडे कुटूंबीय वडिल तांगडे. टी. एन. हे 02/02/1978 रोजी राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा औरंगाबाद येथे नियुक्त झाले व संपूर्ण जीवन येथेच व्यतीत केले ते 31/07/2016 रोजी सेवा निवृत्त झाले. ते असे सांगतात. की माझा मोठा मुलगा व त्यांचा मित्र डॉ. उदय डोंगरे हे मला सांगितले की स्वप्नीलला आपण खेळाडूच बनवायचे मला हीकाही उमजेना परंतु शेवटी मुलाने व डोंगरे सरांनी म्हंटले ते योग्य मानुन त्याचे संपूर्ण लक्ष या खेळाकडेच वळवले व तो मुलतच कष्टी व जिद्दि असल्याने ई.6 वी पासून 3-3/4-4 तास सराव करायचा आम्हीही त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले तो ते सार्थ करुन दाखवला. 


रशियाला जाण्याचा विलक्षण प्रसंग त्यांनी कथीत केला ते म्हणाले मी शक्य तीतकी आर्थिक तरतुद केली परंतू ती पुरेशी नव्हती त्यांचे गुरु डोंगरे सर यांनी धीर देत मदत केली त्यांच्या मित्रमंडळीनीही खुप मदत केली व शेवटी रशियाचा सोपस्कार पार पडला असे जीवनातील अनेक अनुभव त्यांनी सांगीतले. शासनाने योग्य त्यावेळी सन्मान केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.


आई सौ. कांताबाई तांगडे यांनीही स्वप्नील हा खूप मेहनती व जिद्दी असल्याचे सांगितले. आम्ही आमचे सर्व जीवन हे स्वप्नीलमध्येच पाहतो. हे सांगताना त्यांच्या चेहर्‍यावर विलक्षण शांतता होती. जूनी आठवण सांगताना स्वप्नील हा ई. 7 वी त असतात ग्वाल्हीयरला पाठवावयाचे होते. तेव्हा मन अगदी भरुन आले होते. परंतू जड अंतकरणाने त्याला खेळाकरता पाठवले आजही तो जाताना तीच भावना असते परंतू तो शिखर सर करुन येणार याचे समाधान असते अशा भावना व्यक्त केल्या. 


स्वप्नील आपल्या आई - वडिलांचे स्पप्लं अगदी 27-28व्या वर्षीच सार्थ करुन दाखवले. अनेक प्रथितयश पुरस्कार मिळवून त्यांनी आपल्या कार्याची चूणुक दाखवली. आपल्या दिवगंत मोठया बंधूचे स्वप्नं पूर्ण करण्याकरता दिवस रात्र एक करुन मेहनत करतो गुरु डॉ. उदय डोंगरे सर यांच्यामुळेच हे सर्व यशोशिखर गाठता आल्याचे ते सांगतात. 


यापुढे पालकांनी जर आपल्या पाल्याची आवड बघून या क्षेत्राकडे वळवले तर खूप मोठा वाव या क्षेत्रामध्ये आहे. योग्य वय, जिद्द, मेहनत, चिकाटी, लक्ष्य भेदण्याची क्षमता, व्यवस्थीत आहार (Balanced Diate) या बळावर खूप मोठा यश खेचून आणता येते. व आपल्या राष्ट्राकरताही काही करता येते. माझे संपूर्ण जीवन हे उदयोन्मुख Olympiad खेळाडू तयार करणे व Fencing करताच व्यतीत करणार असल्याचा त्यांचा मनोरथ आहे. याप्रसंगी त्याने आवर्जून महाराष्ट्र फेन्सींग अ‍ॅसोसियशनचे सचिव व भारतीय फेन्सींग अ‍ॅसो. चे सहसचिव डॉ. उदय डोंगरे, औरंगाबाद जिल्हा फेन्सींग अ‍ॅसो. चे दिनेश वंजारे कोच श्री. स्वप्नील शेळके, महेश तवर, सुरज लिपणे, संजय भुमकर, भुषण जाधव, हरिशकर राजपुत यांच्याप्रती कृतज्ञाता व्यक्त केले.


जर योग्य वयात पाल्याची योग्य आवड ओळखून त्यामध्ये जर प्रावीण्य मिळवणे तर यशश्री हे सहज मिळवता येते. मात्र अशा प्रसंगी स्वप्नील सारखे आई-वडील , गुरुवर्य, मित्रमंडळी ही तेवढयाच तोलामोलाचे लागतात. हे ही तेवढेच सत्य, एरवी मराठयांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कला किंडा प्रकार खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या या मातीत परत एकदा त्याच जोमाने, उत्साहाने रुजला पाहीजे फक्त वारसा न सांगता तो तेवढयाच प्रकर्षणाने व ताकतीने आज सांभाळणे गरजेचे आहे. शासनाने याची दखल घेवून Fencing (तलवार बाजी) या खेळाला राजश्रय देवून महाराष्ट्र क्रिडा प्रबोधीनीमध्ये याचा समावेश करुन शेक्षणिक स्तरावर याचा प्रचार, प्रसार केला पाहीजे तरच अशा प्रकारची कला क्रिडा प्रकार जीवंत राहु शकेल. 


तशी मा. मुख्यमंत्री साहेबांनी 33 खेळाडूंना थेट शासन नौकरीमध्ये घेवून नवसंजीवनी देण्याचा व खेळाडूंप्रती असणारे आस्थेची ईथीश्री (सुरुवात) केलेलीच आहे त्यांचेही याप्रसंगी ह्रदयपूर्वक हार्दिक आभार.


स्पप्नीलसारख्या कर्तत्वाच्या महामेरुला त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा व असेच अनेक स्पप्नील या महाराष्ट्राच्या मातीत स्वप्नं सत्यात उतरवण्यास सज्ज होतील अशी मनोकामना व सदिच्छा देवून अनेक मनातील काहर दमन होऊन पुनश्‍च: भेटीचे आश्वासन देवून आम्ही मार्गस्थ झालो.


Rate this content
Log in