“
उगवला रविवार
उगवला रविवार
नाही आज कुठे घाई
सुटी असते सर्वांना
गुंग कामातच आई.
आज आहे रविवार
नास्ता आज मस्त भारी.
डोसा इडली खमण
चटणीची चव न्यारी.
खाऊ मटण चिकन
करू पुलाव बिर्याणी.
रविवार असा खास
खवय्यांना रे पर्वणी.
घर साफ सफाईची
रविवारी करू सारे.
मौजमजा भटकंती
चित्रपट बघू तारे.
कामातून विरंगुळा
मिळे आम्हा रविवारी.
रोजचीच लगभग
नसे ती जबाबदारी.
कुसूम चौधरी दोंडाईचा.
”