दिवाळीत प्रत्येक दिवा, पणती, आकाश कंदील लावताना चेह-यावर एक स्मित उमटायचं. किती जणांचा हा अनुभव? माझा नक्कीच! यापुढे, दिवा लावताना मनात , 'हा सकारात्मकतेचा दिवा!' म्हणत दिवा लावू. आशेचा दिवा, सकारात्मकतेचा दिवा! - दीपा वणकुद्रे
सर्व गुण, समर्पयामि, अवगुण, समर्पयामि, निर्विकार होत्साता, जीवनम, समर्पयामि! अर्थात: सर्व गुण, दुर्गण समर्पित करून निर्विकार अवस्था होईपर्यंत जीवन समर्पित (कर्म) करत रहाणे.
जो असा पडतो, तुटतो, कधी मनातून मोडतो पण उठतो, बरा होतो, नव्या जोमाने चालतो.... तो माणूस! - दीपा वणकुद्रे