आयुष्यात आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशोब लागला कि उरलेलं आयुष्य सुकर होऊन जातं ....
संकल्प म्हणजे दैनंदिनीमधला शोभिवंत शब्द नसून
अखंड ऊर्जा ,ऊर्मी नि उत्साहाने भरलेला निश्र्चयाचा महामेरू असतो.
हृदयाच्या प्रत्येक धक..धक ...मधून आवाज येतोय...
"जे जे वेचले ..जे जे मिळवले ...ते ते..
ओंजळभरून उधळावयास आता बाहेर पडायला हवं..."
ग्रंथ, पुस्तकं हे असे जिवलग मित्र आहेत
जे नेहमीच न मागता फक्त देत राहतात
ते ही परतफेडीची किंचित ही अपेक्षा न ठेवता ...
सिद्दी आणि प्रसिद्धीचा मार्ग
संकल्पातून जातो .
अहंकाराचे सर्वात सूक्ष्म रूप म्हणजे राग...
अपयश माणसाला जगण्याची परिभाषा शिकवते.
ज्यांना आपल्या आयुष्याचा मार्ग आणि दिशा ठरवता येते तोच आयुष्याचा चालक नि दिग्दर्शक बनतो.
दृष्टिकोन विशाल आणि व्यापक असेल तर
कुठल्याही वृत्तीचे मापन
डोळसपणे करता येते.