ज्ञानाच्या तेजाची प्रतिमा नेहमीच प्रभावी असते. परंतु, वाणीला जर अहंकाराचा वास येत असेल तर मात्र त्या प्रतिमेला तडा गेल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या विचारांना ग्रहण लागता कामा नये. कारण एकवेळ पृथ्वीवर पडलेल्या सावलीच्या दोषांचे निवारण करता येईल पण विचारांना लागलेल्या ग्रहणाचे निवारण करता येणार नाही.
ह्र्दयाचे ठोके आणि श्वास हे अखंड कार्यरत असणे म्हणजे त्या शक्तीचे अस्तित्व..!! सतत त्या शक्तीचे स्मरण असावे.