कमीच असतं
आयुष्य प्राजक्ताचं
पण
तेवढ्यात ही सुगंधीत करतं
प्रत्येकाच्या मनाला
अन् मोहून टाकतं
प्रत्येक क्षणाला
सूर्याचे चे ही हृदय पाघळते
अस्त होत आल्यावर
कठोर अंतर ही हळवे होते
क्षण निरोपाचा
जवळ आल्यावर
उदरभरण होय
कर कमलांची करणी
अवघे कर्म होय
पद,नेत्र,
अशा असंख्य इंद्रियानी
झळा उन्हाच्या झेलतो
धारा घामाच्या गाळतो
कुणबी तहानतो भुई सम
जपतो तिला
आपल्या आई सम
जीव काहिली होतो
उन्हाच्या झळांनी
एका थेंबासाठी
हिंडतो अनवाणी
चैत्राची पालवी
खेळ ऊन सावल्यांचा
अंकुरली आशा पर्णोपर्णी
कुणबी राजा उल्हासला
मनमोहक भासे अवनी
कुंभार होवूनी गुरु
आकार घड्याला देतो.
कणखर मजबूत करण्या
बळ संस्कार भट्टीतून देतो
अंगणातल्या चाफ्याचं
नवलच वाटतंय
एकही पान नाही साथीला
ऊत आलाय तरीही
फुलांच्या बहरण्याला
तरू हरेभरे होतात
मुळे पाणी त्यांना देतात
नाव होतं डेरेदार त्या तरू चं
कुणीच नाही कसे
मुळांना श्रेय त्याचे देतात.