ती चमकते लुप्त होते
एवढे कळते
जाळते ती घर कुणाचे हे कुठे कळते
आयुष्यभर साजरी आम्ही
आनंदाची होळी केली
सलाम आज विरांना ज्यांनी
आयुष्याची होळी केली
- डी एम कांबळी
अंतसमयी लोक येथे फार खोटे बोलती
जन्मभर देती शिव्या जाताच सुमने उधळती
-डी एम कांबळी
What differs people? Courage.
Courageous people never think so much they just do it...
So on which side do you belong?
Think about it.
- DK
आकाशात रंगाची जशी
उधळण होत जाते
पाहुन ते रंग मन
फुल पाखरु होऊन जाते
झाडावरती एक खोपा
सुगरण ती विणत जाते
पाहुन ती कलाकुसर
मी स्वतःला विसरून जाते
- डी एम कांबळी
चाकोरी सोडून चकोर चालला
चंद्राला सोडून ता-यास भेटला
मनमोकळे हसता येतं
एवढं एक बर
अजून तरी हसण्यावर
नाही कुठला कर..
अभिनय करतो
की मी जगतो...
रडतो तर मी
क्वचित हसतो..
अभिनय करतो
की मी जगतो...
रडतो तर मी
क्वचित हसतो..