अशी अचानक वावटळ आली मनाचे घरटे विस्कटून गेली विश्वासाचा पक्षी कधीच उडाला शेवटी फक्त आठवांची धुळ राहिली
"थंडीची चाहूल लागताच गरिबाला थोडी शेकोटीरुपी ऊब तरी मिळणार ऊनी कपडे घातलेल्या मुलाखतकाराला थंडी काय असते, कसं काय कळणार?"
"सुख दुःखाचे जरतारी वस्ञ या तर चित्तावरच्या लाटा दोन्हींमध्ये जो राहिल शाश्वत त्याच्या आनंदास नसेल तोटा"
"आदर्श घेऊन झाशीच्या राणीचा लढूया संकटाशी दोन हात करुन जिजामातेचा वसा चालवूया सावित्रीच्या लेकी बनून"