तुझ्या प्रेमाची
चढली नशा
मनाची समजून
घे थोडी दशा
तारे मला नेहमीच
आहेत प्रेरणादायी
मार्गदर्शन त्यांचे
नेहमीच मिळत राही
ज्ञान देणे हा माझा पेशा आहे
ज्ञानदान हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे
हे महत्वाचे नाही तुला
लोक समजतात किती
हे महत्त्वाचे आहे तु
स्वतःला समजते किती
माझ्यातच आहेत दुर्गा,
काली आणि सरस्वती
तरीही आजच्या युगात
परावलंबी हीच परिस्थिती