आयुष्याचा गोडवा गुळाच्या
तिळात सर्वत्र मिसळला,
आनंदाचे क्षण सारे जपूनी
नात्यांचा धागा हा विणला.
जग थांबले तुझ्यासाठी प्रिया
मन तुझ्या प्रेमासाठी
साद तु घातली मज
अन् हरवून गेली मी तुझ्यासाठी
क्षण एकांताचे मन भारावून गेले
उंबरा ओलांडूनी मी न माझी राहिले
शब्दांच्या मनातलं प्रेम ते जाणले,
शब्दांच्या वेलीवर ते साजिरे रुप सजले.
नजरे ने कळले ते प्रेमळ भाव तुझे,
शब्दाविना फुलले ते प्रेम हे माझे.