वेळ आणि माणूस कधीही बदलू शकतो. मात्र संघर्ष कधीही बदलू शकत नाही.तो शेवटपर्यंत कायम करावाच लागतो.
वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं .......
त्याच्या सारखा जादूगार
जगात कोणीच नसतो.
जेव्हा आपलेच लोक आपले शत्रू बनतात तेव्हा शत्रुसुद्धा आपल्याला आपले मित्र वाटू लागतात.
सुखी लोकांना दुःखी आणि दुःखी लोकांना आनंदी करणारं वाक्य म्हणजेच .........
'हे दिवससुद्धा निघून जातील.'
आपल्या मागे होणारी चर्चा आणि बदनामी हीच आपली खरी प्रगती आहे.
अनुभव आणि वेळ माणसाला सर्वकाही शिकवून जातात.
विश्वासघात तेच लोक करतात ज्यांच्यावर आपण पुर्ण विश्वास ठेवतो.
Yesterday is history
Tomorrow is a mystery,but
Today is a gift that's why it's called the 'Present'.
ज्या भीतीचा आपण सामना करू शकत नाही,भविष्यात तीच भीती आपल्या मर्यादा निर्धारित करणे सुरू करते.