आपण कुणाच्या तरी मर्जीत आहोत
म्हणजेत्यांच्यादेवघरात आपलीछोटीमुर्तीअसणं
आपण कोणाच्या तरी प्रेमात आहोत म्हणजे
त्यांच्या आकाशातलं इंद्रधनुष्य असणं
डॉ. अनिल कुलकर्णी
जिवनाचा गुलमोहर
करायचा की निवडुंग
हे पाच नाजुक बोटांचे
कौशल्य ठरवतात
डॉ. अनिल कुलकर्णी
दुःखाला गोंजारायचं नसतं
सुखाला पिंजायचं असतं
क्षणाची असतें आठवण
आयुष्याची असतें साठवण
शब्दांनीच छळलें होतें
शब्दांनीच रडविले होतें
शब्दांवर जेंव्हा प्रेम केलें
शब्दांच्या चांदण्यात कविता नहालीं.
अजूनही बरसात आहे
अजूनही चांदरात आहे
आता सोबत फक्त
आठवणींची सांजवात आहे.
ज्यांना पोटातच
संपवायचं होतं
त्यांनी फोटोतच आपलं
कर्तृत्व सिद्ध केलं.
गर्भात ज्यांनी सहन केला अपमान
जनमानसात त्यांनी मिळवला सन्मान
नको असतांना पोटात
स्थान मिळविले त्यांनी फोटोंत.
पावसाचा मृदुगंध
जसा टाळमृदुंग
जमिनीतून उमले
चैतन्याचे रंग.
स्वप्न वेळेत पूर्ण करा
स्वप्नांचा ही सुर्यास्त असतो
प्रेम वेळेत व्यक्त करा
प्रेमाची ही सुगी असते.