मातृभाषा हि काय फक्त कागदोपत्री व्यवहारात भरला जाणारा रकाना नसते मातृभाषा म्हणजे बोबड्या आवाजात अडखळलेला पहिला शब्द विचारांच्या डोहात उठलेला पहिला तरंग स्वतःचे सत्व जपणारा आरसा शेवटच्या श्वासापर्यंत जपत राहावा असा एक अमुल्य वारसा ~ भावनेश
छेडलीस तार या हृदयाची तव उठले काहुर स्पंदनांचे तुझ्या अबोल नजरेची भाषा जणु संगीत माझ्या जीवनाचे ~ भावनेश पोहाण
फॅमिली व्हाट्सऍप ग्रुप बनवला कि प्रत्यक्ष भेटणं-बोलणं टळत टाकलेल्या स्टोरीस वरून मात्र भांडणाला एखाद निमित्त मिळत ~ भावनेश पोहाण
काळाच्या ओघात अन या हिशेबी जगात त्या दोघांचंही नाव आता पुसुन गेलंय पण तिनं दिलेल्या कॅडबरीचं सोनेरी wrapper त्यानं आजही त्याच्या वहीत जपुन ठेवलंय ~ भावनेश पोहाण
केल्या नव्हत्या मी कुठल्याही खाणाखुणा अन गुडघ्याचे व्यायाम सुद्धा केले नव्हते नजरेतुनि विचारलेल्या प्रश्नाचे माझ्या तेव्हा तिने नजरेतुनिच उत्तर दिले होते ~ भावनेश पोहाण