शब्द शब्द जप
अर्थ अर्थ शोध
होईल अशी मागणी
कवेत घेण्यास अंबारा
दिशा दाही झुकतील
आज वर्षानंतर प्राजक्ताची ताजी टवटवीत फुले ओंजळीत
घेऊन मन प्रसन्न झालं , केशरी दांडी पांढरी झाक
किती सुंदर .... ती तशीच असतात , पण माणसं मात्र बदलतात जवळची दूरची ......
" परिजातका सुगंधी आणि सात्विक हो " ह्या वाक्याचा तिटकारा व्हायचा !
आयुष्य म्हणजे निवळ खडतर प्रवास का ? ज्याच्या वाटेला येईल त्याने तसा जगावा......
भूतकाळात काहीच हरवत नाही , तिथे न बदलता येणार सारं काही साठवल्या जातं .... तरी देखील आपण आपला वर्तमान सोडून भूतकाळातच का अधिक जगत असतो ? एक उनाड प्रश्न 😴