क्षितिजाला भिडणारी तुझी नजर
रात्रंदिन ती काय शोध घेते
तुझ्या मोहक रुपाने साजणे
नकळतपणे मला प्रेमविश्वात नेते
प्रांजली काळबेंडे
माय माऊली शेतातली
तिचं लावण्य निराळं
माती,धुळ अंगावरती
दिसे सौंदर्य जगावेगळं
सौ. प्रांजली काळबेंडे
दिल्या घेतल्या वचनांचा
आदर करावा लागतो
मार्गातल्या अडथळ्यांशी
हळूवार संवाद करतो
सौ. प्रांजली काळबेंडे
धर्माच्या नावाखाली ,फोफावला आहे भ्रष्टाचार
वाईट आचरणाने, वाढवला मानवाने दुःखाचा भार
अंधश्रद्धा हा मानसिक रोग असुन तो माणसाच्या मानसिक आजारपणाचे द्योतक आहे.