पानगळ...होताना.... पानगळ ती तर होणारच, नव्याने पालवी फुटण्यासाठी पानांना इतका त्याग तर करावाच लागतो..नव्याने उभरायचं म्हटलं तर जुन्याने सुकून जाणं भागच आहे...सृजनशील मनाला समर्पणाच्या कसोटीला सामोरं तर जावंच लागेल..त्याशिवाय काय नवी उमेद जन्म घेणार? नवीन आशेसाठी जुन्या इच्छांना मुरड घालून वाट मोकळी तर करावीच लागते ...सुकून गेलेलं मन सुद्धा असंच पानासारखं बैचेन होतं...मनाची पानगळ होताना ...
वाढ हे सर्व सजीवांना लाभलेलं निसर्गाचं अमूल्य योगदान शारीरिक मानसिक वाढ झाली की मनुष्य ही समृद्ध होतो
प्रेमानेच प्रेम जडते, प्रेमानेच प्रेम वाढते, आणि एक दिवस हेच प्रेम आयुष्यभरासाठी "एक सवय" बनते, अशी सवय जी प्रेम जिंकणाऱ्यासाठी चांगली, पण हरणाऱ्यासाठी मात्र कधीही वाईटच ठरते.....प्रेम काय..सवय काय दोन्ही सारखेच....प्रेम एकदा केलं तरी संपत नाही...आणि एकदा लागलेली सवय ही मोडता येत नाही........
दुर्लक्षित झालेल्या इच्छा कधी कधी आपलं सर्व सुरळीत शांत चालू आहे असं वाटत जरी असलं तरी मनातील काही सुप्त इच्छा नेहमी डोकावून बघत असतात, त्या शांत राहू देत नाहीत , त्या पूर्ण व्हाव्या ही आशा असते . पण ती पूर्ण नाही होणार या कारणांचा जास्त विचार करून ती आपल्याकडून दुर्लक्षिली जाते...आणि इच्छापूर्ती च्या शक्यतांचा विचार करण्यास आपण कमी पडतो. एखादी मनापासून हवी असलेली गोष्ट, प्रयत्न करूनही मिळाली ना